Share

‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही,अशा लोकांना लाज वाटायला हवी’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- गुजरातमधील अहमदाबाद शहरात विवाहितेच्या आत्महत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयशा नावाच्या एका युवतीने अहमदाबादमधील साबरमती नदीच्या काठावर हा व्हिडिओ बनविला आहे. कुटुंबाला निरोप दिल्यानंतर तिने नदीत उडी मारून आपले आयुष्य संपविले.

दरम्यान, या प्रकरणाचे सोशल मिडीयावर पडसाद उमटत आहेत.नेटकरी सोशल मिडीयावर संताप व्यक्त करत आहेत. आयशाचे लग्न आरिफ नावाच्या युवकाशी झाले होते, पण लग्नानंतर लगेचच त्याने आयशाच्या कुटूंबाकडून हुंड्याची मागणी करण्यास सुरवात केली. सुमारे दीड लाख रुपयांची व्यवस्था करुन आयशाच्या वडिलांनी त्याला पैसे दिेले, परंतु काही काळानंतर त्याने पुन्हा मागणी करण्यास सुरवात केली.

आयशाच्या कुटुंबीयांनीही याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते पण आयशाच्या बोलण्यातून असे दिसते की तिचा पती असलेल्या आरिफवर तिचे प्रेम आहे आणि ती केस मागे घेण्यास सांगत आहे.आयशाचे वडील लियाकत अली यांनी सांगितले की, मुलीचे लग्न २०१८ मध्ये जालोर (राजस्थान) येथे राहणाऱ्या आरिफ खानसोबत झाले होते. पण लग्नानंतरच तिच्यावर हुंड्यासाठी छळ करण्यात आला.वडिलांनी सांगितले की, आरिफचे कुटुंबीय दीड लाखांची मागणी करीत होते त्यांनी काही पैशांची व्यवस्था केली देखील मात्र त्याचा लोभ वाढत गेला.

यांनतर आरिफने आयशाला अहमदाबादला सोडले. काही दिवसांपूर्वी आयशाने आरिफला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती पण आरिफने उत्तर दिले की जर तुला मरायचे असेल तर जा आणि मर. यामुळे आयशाने हे पाऊल उचलले.

‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही,अशा लोकांना लाज वाटायला हवी’

दरम्यान, आता या प्रकरणी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तिच्या सासरच्या मंडळींना चांगलेच झापले आहे .ओवेसी यांनी एका सभेत बोलताना आयेशाच्या मृत्यूवर खंत व्यक्त केली.

ते म्हणाले,”अहमदाबादमध्ये एका मुस्लीम तरुणीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, धर्म काहीही असो, हुंड्याचा लोभ संपवा. आपण पुरुष असाल, पण आपल्या पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करणे म्हणजे पुरुषत्व नाही. बायकोकडे पैसे मागणे हे पुरुषत्व नाही. जर तुम्ही असे कृत्य करत असाल, तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत,” अशा शब्दात ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले,“त्याने (आयशाचा नवरा) निर्दोष मुलीचा छळ केला. त्या त्रासाला कंटाळून तिनं मोठं पाऊल उचललं. एका निरागस मुलीसोबत असं करताना अशा लोकांना लाज वाटायला हवी. मी अल्लाहकडे प्रार्थना करीन की अल्लाह तुमचं वाटोळं करो. काय झालंय या लोकांना?, आपण अजून किती महिलांचा जीव घेणार आहोत?, तुम्ही कसले मर्द आहात?, जे महिलांना मारतात. तुमच्यातील माणुसकी मेली आहे का? असे किती लोक आहेत जे आपल्या पत्नीवर अत्याचार करतात? हुंड्यासाठी गर्भवती महिलांना मारहाण करत घराबाहेर काढतात आणि स्वतःला मोठा देवदूत समजतात. लक्षात ठेवा, आपण जगाला फसवू शकता आणि अल्लाहला नाही. हे लक्षात असुद्या तुम्ही जगाला धोका देऊ शकता अल्लाह नाही. अल्लाह सगळं पाहतोय”.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!