🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने राज्याचा २० सदस्यीय वरिष्ठ महिला संघ जाहीर केला. या संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादची अष्टपैलू खेळाडू प्रियंका गारखेडेची निवड करण्यात आली आहे. प्रियंकाला ८८ एकदिवसीय आणि ५५ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर तिने २५० पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. या स्पर्धेत प्रियंका गारखेडे प्रथमच संघाचे नेतृत्व करणार आहे.
पहिला सामना १२ मार्चला जयपूरमध्ये
कोरोनामुळे आमच्या २ ते ३ चाचण्या होतील. सहा दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर आम्ही मैदानात उतरू. संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, त्यामुळे आम्ही विजय खेचून आणू, असा विश्वास कर्णधार प्रियंका गारखेडेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने ६ मार्च २०२० रोजी गोव्याविरुद्धचा वनडे सामना हिमाचल प्रदेशात खेळला होता. त्यानंतर वर्षभरानंतर आता संघ मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना १२ मार्चला जयपूर येथे होईल.
महाराष्ट्राचा संघ : प्रियंका गारखेडे, अनुजा पाटील, देविका वैद्य, तेजल हसबनीस, शिवाली शिंदे, मुक्ता मगरे, माया सोनवणे, श्रद्धा पोखरकर, उत्कर्षा पवार, सायली लोणकर, अदिती गायकवाड, प्रियंका घोडके, ऋतुजा देशमुख, वैष्णवी शिंदे, ईशा पठारे, चर्मी गवई, श्रावणी देसाई, ऋतुजा गिलबिले, पूनम खेमनार, संजना वाघमोडे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- ‘त्या’ एक हजार ३०५ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार-एकनाथ शिंदे
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
