Share

‘या’ टेलिकॉम कंपनीने केला जाहिरात व्यवसायात प्रवेश !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: जिओ ला टक्कर देणारी टेलिकॉम कंपनी म्हणजे भारती एअरटेल या कंपनीने जिओ ला मोठी स्पर्धा निर्माण केली असून नावानावीन योजना आणत ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. तसेच एअरटेल ने हैद्राबाद शहरात 5 G चाचणी यशस्वी केली आहे.

एअरटेल 5 जी सेवा यशस्वीरित्या प्रदर्शन आणि आयोजित करणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. एअरटेल १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे आपल्या विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमचे प्रसारण करते. डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरींगचा वापर करून, एअरटेलने एकाच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये एकाच वेळी 5G आणि 4G ऑपरेट केले. या कामगिरीने एअरटेलच्या नेटवर्कच्या सर्व डोमेन रेडिओ, कोर आणि ट्रान्सपोर्टच्या नेटवर्कच्या 5G सशक्त रूपने मान्य केले आहे.

त्यांनतर आता एअरटेलने एअरटेल अॅड्स लाँच करून जाहिरात व्यवसायात प्रवेश केला आहे. एअरटेल अॅड्स एक शक्तिशाली ब्रॅण्ड एंगेजमेंट सोल्युशन आहे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये तसेच मोबाईल, डीटीएच आणि घरांमध्ये 320 मिलीयनहून अधिक एअरटेलचे ग्राहक आहेत. कंपनीच्या सखोल डेटा विज्ञान क्षमतेचा वापर करून एअरटेल अॅड्स ब्रँड्सना घराघरात पोहोचवणार आहे. केवळ ऑनलाईन ठसा उमटवण्याऐवजी ब्रँडच्या खर्चावर उत्तम परतावा देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!