Share

महिला दिनी होणार समृद्धीच्या लेकींचे ‘नामकरण’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : समृद्धी वाघिणीने जन्म दिलेले पाच बछडे पिंजऱ्यात फुटबॉलचा आनंद लुटत असून, या माध्यमातून त्यांचा व्यायाम सुरू आहे. दरम्यान बछड्यांचे नामकरण करण्यासाठी २६ नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे बंद लखोट्यात नावे सुचविली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ मार्च या जागतिक महिला दिनी बछड्यांचे नामकरण केले जाऊ शकते.

समृद्धी वाघिणीने जन्म दिलेले पाच बछडे पिंजऱ्यात फुटबॉलचा आनंद लुटत असून, या माध्यमातून त्यांचा व्यायाम सुरू आहे. दरम्यान बछड्यांचे नामकरण करण्यासाठी २६ नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे बंद लखोट्यात नावे सुचविली आहेत. महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या समृध्दी वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पाच बछड्यांना जन्म दिला. सध्या बछड्यांचे संगोपन बंद पिंजऱ्यात होत आहे. आईसह हे बछडे पिंजऱ्यातच आहेत. बछड्यांचे वय किमान तीन महिने होईपर्यंत त्यांना बंद पिंजऱ्यातच ठेवले जाणार आहे. पाचही बछडे मादी जातीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंजऱ्यामध्ये या बछड्यांना गतीने हालचाल करता यावी, यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. बछड्यांचा व्यायाम व्हावा अशी त्यामागची भूमिका आहे असे सांगितले जाते. त्यामुळे पिंजऱ्यात एक फुटबॉल टाकण्यात आला आहे. पाचही बछडे फुटबॉलवर तुटून पडतात आणि दिवसभर फुटबॉल खेळतात.

पालिका प्रशासन बछड्यांचे नामकरण करणार आहे. बछड्यांची नावे काय असावेत, याबद्दल प्रशासनाने नागरिकांकडून नावे मागवली आहेत. २६ नागरिकांनी बंद लखोट्यात प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला नावे कळवली आहेत. नावे कळवण्याचा २८ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता. नागरिकांनी कळवलेली नावे तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवली जाणार आहे. समिती जी पाच नावे निवडेल ती नावे बछड्यांना दिली जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!