Share

धक्कादायक! १०० कोटींचा घोटाळा; केंद्रेकरांनी दिले चौकशीचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्र. ३६१ मधील भुसंपादनात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. आयुक्तानी तत्काळ यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१मध्ये ४४० कोटींपर्यंत भूसंपादनाचा मोबदला देण्यात आलेला आहे. मात्र यातील १०० कोटींचा मोबदला शासकीय जमिनींच्या मोबदल्यात देण्यात आला आहे अशी तक्रार शिवसेना नेते व सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यावेळी या संदर्भात त्यांनी पुरवेही सादर केले आहे. या सगळ्या प्रकरणामुळे तेथील उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन प्रक्रियेतील यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या घोटाळ्याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे सत्य असेल ते सर्वांच्या समोर येईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले,

नांदेड जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात भूसंपादन निवाडे आणि सुनावणी स्थगित करण्यात आली होती. मात्र, स्थगितीनंतरही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावण्या करुन गैरफायदा घेत शासकीय जमिनी खासगी मालकीत दाखवत मोबदला देण्यात आला आहे अशी तक्रार मारावार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!