Share

फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चात बचत- नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासाठी सरकारकडून फास्टॅग प्रणालीराबवण्यात येत आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. तर, याआधी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांसाठी, टोलनाके, बँका यासह फास्टॅग केंद्रे देखील निर्माण करण्यात आले आहेत. यासोबतच, फास्टॅग ऑनलाईन पद्धतीने देखील काढण्याची सोय करण्यात आली होती.

पथकर नाक्यावर वाहनांची कोंडी टाळणे व महामार्गावरील अखंड वाहतुकीसाठी फास्टॅग प्रणालीला आता मुदतवाढ दिली जाणार नाही, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. ‘फास्टॅगसाठी यापूर्वी २-३ वेळा मुदतवाढ दिली. ८० ते ९० टक्के मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दहा टक्के शिल्लक आहेत. यापुढे मुदत वाढवणार नाही. सर्व पथकर नाक्यावर व अन्य ठिकाणी फास्टॅग आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तत्काळ खरेदी करावी,’ असं आवाहन देखील गडकरींनी केलं होत.

त्यांनतर आता त्यांनी महामार्गावरील फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चावर वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही 10,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रस्ता, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की’ महामार्गावरील प्रवास आणखी सुदृढ करण्याच्या दिशेने हे पाऊल आहे.’ सोमवारी देशभरातील टोल प्लाझावर थेट परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टम लाँच करताना ते बोलत होते.

माध्यमांना संबोधित करताना गडकरी म्हणाले,’फास्टॅग मार्गे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टोल कलेक्शन केल्याने टोल प्लाझावरील विलंबापासून मुक्तता मिळाली आहे. यामुळे इंधनाच्या वापरामध्ये वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही दहा हजार कोटी रुपयांची वाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!