🕒 1 min read
पुणे : बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे.
संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले.
पुजाच्या कुटुंबीयांनी सरकार आणि तपास यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ”आम्ही आमची मुलगी गमावली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना शिक्षा द्यावी. या प्रकरणातील संशयावरून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु, केवळ संशयावरून राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत दिवसेंदिवस अनेक नवा खुलासा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान आता पूजा चव्हाण प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे.
पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा’ मराठी चित्रपटातील स्टार अभिनेता भीषण अपघातातून थोडक्यात बचावला ; मानले चाहत्यांचे आभार
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
- अकरा हजारांची लाच घेताना वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीने रंगेहात पकडले
- ‘या’ गावाचा सोयगाव तालुक्याशी संपर्क तुटला
- संत नामदेव महाराजांचे मंदिर पुन्हा प्रकाशमान; १० दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
