Share

कृषी संशोधन, विस्तार यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : कुलगूरू डॉ. अशोक ढवण

Published On: 

परभणी :  संशोधनाव्दरे विकसीत तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी संशोधन विस्तार यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठीचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

विद्यापीठाअंतर्गंत कापुस संशोधन केंद्र तसेच कृषी विभागाच्या वतीने शुक्रवारी कापसाच्या उत्पादनवाढीसाठी कार्यशाळा घेतली. या वेळी डॉ. ढवणे हे मार्गदर्शन करत होते. भविष्यात शेतकऱ्यांना बियाण्यांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्यापीठ कापसाचे बीटी स्वरुपात असलेले वाण विकसीत करत आहे. आणि काळाची गरज ओळखुन संशोधन करत आहोत. कापसाचे वाण नक्की उपयोगी सिद्ध होईल. कापसाच्या विविध प्रजातींचा समतोल राखण्यासाठी देशी कापसाचे अंदाजे ते १० – १५ टक्के पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे असल्याचे मत या वेळी कुलगुरुंनी मांडले.

डॉ. प्रसाद यांनी कापुस संशोधन केंद्राव्दारे विकसीत वाण तसेच तंत्रज्ञान आणि सुरु असलेल्या संशोधनाचे कौतुक पण या वेळी केले. कोरडवाहू कापसाच्या भागातील उत्पादकता वाढवण्यासाठी तंतोतंत नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यापीठास संशोधनासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देखील या वेळी कुलगुरु यांनी दिली आहे. डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, राज्यामध्ये एनएचएच ४४ ( बीजी २) हा बिटी संकरीत वाण वसंतराव नाइक मराठवाडा विद्यापीठातून विकसीत केली आहे. त्यानुसार एनएचएच ७१५ हे नवीन संकरीत वाण देखील बीटी रुपात परिवर्तीत करुन शेतकऱ्यांच्या सेवेत सर्मपीत करणार असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!