Share

‘मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय आणि आमचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान देतायत !’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यात पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांवर प्रशासन धडक कारवाई करताना दिसून येत आहे मात्र सगळे सरकारी कायदे, नियम आणि शिक्षा या फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वरळी भागातील पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला आहे.मनसे नेते संतोष धुरी यांनी एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात कसे नियम पायदळी तुडवले जात आहेत याची पोलखोल केली आहे.

ही बाब समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह सरकारवर चौफेर टीका होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी सद्या सुरु असलेल्या ‘पावरी’ ट्रेंडचा उपयोग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान देतायत !’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

अखेर ‘त्या’ पबवर होणार कारवाई !

दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!