Share

‘रडगाणं गात बसण्यापेक्षा खेळ सुधारा…’ ; व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी घेतली इंग्लंडच्या खेळाडूंची शाळा

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारत आणि इंग्लंड  यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत.अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच आता वेस्टइंडिजचे माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी खेळपट्टीवरुन सुरू असलेल्या वादात उडी घेतली असून खेळपट्टीचा बचाव करत इंग्लंडच्या खेळाडूंना खडेबोल सुनावलेत.

जर मला संधी मिळाली असती तर मी चौथ्या सामन्यातही तशीच खेळपट्टी बनवली असती, असं रिचर्ड्स म्हणालेत. व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत म्हटलं की, भारत-इंग्लंडमध्ये अलिकडेच झालेल्या कसोटी सामन्याबाबत मला अनेकांनी प्रश्न विचारण्यात आले. ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्यावरुन बरीच टीका होतेय…पण जे टीका करतायेत त्यांना हे समजायला हवं की तुम्हाला अनेकदा सीमिंग खेळपट्टी मिळते, गुड लेंथवरुन उसळी घेणारे चेंडू बघितल्यावर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी समस्या असल्याचं अनेकजण विचार करतात. अनेकदा फलंदाजांना तशा खेळपट्टीचा सामना करावा लागतो.

पण आता तुम्ही दुसरी खेळपट्टी बघितली…आणि म्हणूनच मला वाटतं याला कसोटी क्रिकेट नाव देण्यात आलं आहे, कारण तुमच्यातील सर्व बाबींची कसोटी यात लागते. खेळपट्टी फिरकली साथ देणारी आहे अशी जर तुमची तक्रार असेल तर ती नाण्याची दुसरी बाजू आहे. लोकं हे विसरतात की तुम्ही भारतात जातायेत तर तुम्हाला अशाच खेळपट्टीची अपेक्षा ठेवायला हवी. तुम्ही फिरकीच्या भूमीवर जात आहात. तुम्ही तिथे कशासाठी जातायेत आणि तिथे कशाचा सामना करावा लागणार आहे याची तुम्ही तयारी करायला हवी.

कसोटी लवकर संपल्यावरुन रडगाणं गात बसण्यापेक्षा इंग्लंडने परिस्थिती समजून घ्यायला हवी…खेळ सुधारायला हवी…चौथ्या सामन्यात आपल्याला आधीच्याच खेळपट्टीवर खेळावं लागेल असा विचार करुन त्यांनी तयारी करायला हवी. जर मी भारतात असतो किंवा खेळपट्टी बनवणं माझ्या हातात असतं तर चौथ्या कसोटीसाठी मी तशीच खेळपट्टी बनवली असती असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!