🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली.
आयपीएल लिलावानंत खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह ही आयपीएल खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील 6 राज्यात रंगणार आहे. याआधी फक्त 5 शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता. पण सरकारने परवानगी दिल्याने आता मुंबईलाही आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईसह, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएलचा 14 वा मोसम सुरू व्हायला आता काही आठवड्यांचा काळच बाकी आहे. त्याआधी चेन्नईचा (CSK) कर्णधार एमएस धोनी देव दर्शनाला पोहोचला. आयपीएल 2020 साली चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. आता या आयपीएल आधी तो देवडी माता मंदिरात गेला. धोनीची या मंदिरावर आस्था आहे. प्रत्येक मोठ्या सीरिज आणि स्पर्धेआधी धोनी या देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो.
धोनीसोबत त्याचा लहानपणीचा मित्र सिमत लोहानी देखील होता. धोनी येणार म्हणून मंदिराच्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार मंदिराच्या पुजाऱ्याला धोनी येणार याची आधीच कल्पना होती. तो यायच्या एक तास आधीच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
