🕒 1 min read
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढत असून अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात पुन्हा टाळेबंदी करण्याचा इशारा देत आहेत. सोबतच ते कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचं आवाहन देखील करत आहे.मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असाच एक प्रकार समोर आणला आहे.राज्यात इतर ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले असते तर समजू शकण्याची बाब होती मात्र मनसे नेते संतोष धुरी यांनी एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात कसे नियम पायदळी तुडवले जात आहेत याची पोलखोल केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात बिनधास्तपणे मध्यरात्रीपर्यंत पब सुरू आहेत आणि तिकडे कोणत्याही प्रकारचे कोरोनाविषयक ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वरळीच्या कमला मिल कंपाऊंड परिसरात असलेल्या पब मध्ये जाऊन मनसेच्या संतोष धुरी यांनी स्वतः लाईव्ह करून भांडाफोड केला.
‘मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?’, असा सवाल धुरींनी उपस्थित केला.’आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,’ असं धुरी म्हणाले.
या पब मध्ये अनेक तरुण-तरुणी मास्क न लावता गर्दी नारून झिंगताना दिसत आहेत.पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. मध्यरात्री १२ वाजून गेल्यावर देखील या ठिकाणी पब सुरु असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यास सरकार सांगत असताना अश्या पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाभागांवर सरकार का कारवाई करत नाही असा देखील सवाल उपस्थित होत आहे. या पब चालकासोबतच त्याच्या मागे कोणत्या राजकीय शक्ती उभ्या आहेत याचा देखील शोध घेतला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याच मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि सत्ताधारी नेत्यांना टोला लगावला आहे.त्या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आदित्य ठाकरे याचं त्या ठिकाणचे लोक ऐकतात. नाईट लाईफ साठी नेते आग्रही असल्याने त्या ठिकाणचे लोक देखील हे सर्व घडत आहेत.कोरोनाचे नियम हे नाईट लाईफ ला लागू होत नाहीत का ? नियम फक्त सर्वसामान्य जनतेला आहेत तसेच कोरोनाचे नियम फक्त शिवजयंतीला पाळायला सांगितले जातात तसे आदेश देखील दिले जातात मात्र पबसाठी हे नियम लागू होत नाहीत असा उपहासात्मक टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- सायकलवर विधानभवन गाठत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध !
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
