Share

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Published On: 

मुंबई –  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्री पदाचा काल राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे हे प्रकरण संपले नसून  राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात रान उठवलं होतं. माध्यमांनी तर हे प्रकरण उचलून धरलेच होते मात्र भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यानेच राठोड यांची विकेट पडली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात चित्रा वाघ या महाविकास आघाडी सरकारच्या निशाण्यावर असणार हे आता स्पष्ट दिसून येत आहे.

संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असताना आता चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही सरकारच्या एखाद्या मंत्र्याला विरोधकांच्या दबावामुळे मंत्री मंडळातून राजीनामा द्यावा लागणे हे त्या सरकारच्या प्रतिष्ठेवर एकप्रकारे केलेला तो आघात असतो असे मानले जाते.चित्रा वाघ यांनी या प्रकरणात अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका पत्रकार परिषदांच्या माध्यमातून घेत सत्ताधारी नेत्यांविरोधात जनमत उभे केले.यामुळेच सत्ताधारी पक्षातील मंत्री जिथे जातील तिथे त्यांना राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारले जात होते.यातूनच पुढे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

संजय राठोड यांचा राजीनामा भाजपमधील चित्रा वाघ यांचे वजन वाढवणारा असला तरीही यामुळेच त्या आता महाविकास आघाडीच्या रडारवर देखील आल्या आहेत.त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल होणे हि त्याचीच एक झलक म्हणून देखील पाहता येईल. याशिवाय भाजपशासित राज्यात किंवा भाजप नेत्यांचे अशा प्रकरणात नाव आले तर हे तिन्ही पक्ष वाघ यांना लक्ष्य केल्यास आश्चर्य वाटायला नको.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मिडीयावर देखील चित्रा वाघ यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट फिरू लागल्या आहेत.वाघिणीने केली वनमंत्र्यांची शिकार अशा आशयाच्या त्या पोस्ट आहेत तर  उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली जात आहे.उद्धव ठाकरेंवर चित्रा वाघ यांनी या प्रकरणात थेट हल्ला केला नसला तरीही जनतेत काय जी संदेश द्यायचा होता तो देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

दरम्यान, दिवंगत खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडी आता आक्रमक होऊ लागली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. आता आगामी काळात या आणि अशाच काही इतर मुद्द्याचे देखील भांडवल करत सत्ताधारी भाजप,देवेंद्र फडणवीस,चित्रा वाघ यांना घेरतील अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!