🕒 1 min read
मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं.
संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीनंतरच राजीनाम्याबद्दलचा अंतिम निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती.
मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारद्वारे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले.
याच पार्श्ववभूमीवर आता कलाकारांकडून देखील प्रतिक्रिया येत आहे. अभिनेता आरोह वेलणकर याने देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. वेलणकर ट्विट करून म्हणाला, ‘चांगलच झालं, पण फक्त राजीनामा नको, अटक, चैकशी करून सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे!! आता खऱ्या शक्तीप्रद्रशनाची गरज आहे.’
घ्या * चौकशी * शक्तीप्रदर्शन. साहेब काय ट्रोल करायचं ट्रेनिंग देतायत आजकाल. वाह! ????
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 28, 2021
यावर भाष्य करताना पुढे म्हणाला, ‘घ्या! ‘चौकशी’ शक्तीप्रदर्शन. साहेब काय ट्रोल करायचं ट्रेनिंग देतायत आजकाल. वाह! यावरून आता पुन्हा एकदा आरोह वेलणकरने सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता…’
- “राठोडांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मात्र ‘चंद’ यांचा राजीनामा मोदींनी का घेतला नाही ?”
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- मला फडणवीसांची कीव करावीशी वाटते; मुख्यमंत्री ठाकरे कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
