Share

“राठोडांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मात्र ‘चंद’ यांचा राजीनामा मोदींनी का घेतला नाही ?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं.

संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारद्वारे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले.

भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आरोप केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपलाच सवाल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री निहाल चंद यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा का घेतला नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

‘संजय राठोडांनी चौकशीआधीच दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला. घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईलच. माजी केंद्रीय मंत्री निहाल चंदवरील बलात्काराच्या आरोपानंतर मोदींनी राजीनामा का घेतला नाही? याचे उत्तर कथुआ,उन्नाव,हाथरस बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपाने द्यावे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!