🕒 1 min read
बीड : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं.
संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीनंतरच राजीनाम्याबद्दलचा अंतिम निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती.
मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारद्वारे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. राजीनाम्याचे वृत्त समोर येताच भाजपच्या विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करून याप्रकरणी भाष्य केलं आहे. ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे… सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.’ असं भाष्य केलं आहे.
एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. https://t.co/qPn33FbOAx
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 28, 2021
विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धंनजय मुंडेंवर झालेल्या आरोपांमुळे आता त्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. पंकजा मुंडे यांनी या संदर्भातील वृत्तावरच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांचा अप्रत्यक्षपणे रोख हा आपले बंधू धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंना भाजपकडून अभय? फडणवीस म्हणाले, आम्ही आक्रमक पण..
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- मला फडणवीसांची कीव करावीशी वाटते; मुख्यमंत्री ठाकरे कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
