Share

परभणीमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्यांनाकडून १७ हजारांचा दंड वसूल

Published On: 

परभणी : कोरोनाचा कहर पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर हिंगोली जिल्हामध्ये लॉकडाऊन लागलेले असताना मात्र, परभणीकर स्वत:ची घेत नसल्याचे समोर आले आहे. शनिवार तब्बल ८९ जणांकडून विना मास्क फिरणाऱ्यांकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परभणी महानगर पालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग समिती अ, ब, क मध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये विनामास्क २६ नागरिकांनी प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारला. सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, स्वच्छता निरीक्षक महंमद अब्दुल शादाब, लक्ष्मण जोगदंड, न्यायरत्न घुगेसह आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, नानलपेठ परिसरात विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लावला.

या वेळी रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक येथे फिरणाऱ्या २३ नागरिकांना ४ हजार ६०० रुपयांचा दंड प्रशासनाने वसुल केला. कोराना पुन्हा वाढला असल्याने  केलेली ही पहिली दंडात्मक कारवाई आहे. मनपाकडून विना मास्क, सोशल डिस्टंन्स पाळावे, सॅनिटायझरचा वापर नियमीत करावे. गर्दीच्या जागेवर शक्यतो फिरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!