Share

मला फडणवीसांची कीव करावीशी वाटते; मुख्यमंत्री ठाकरे कडाडले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. गेल्या आठवड्यापासून विरोधी पक्षाने राज्यातील विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे अधिवेशन १० दिवसांचं करण्यात आलं आहे. हे सरकार सामान्यांच्या प्रश्नाला घाबरत असल्याने कमी कालावधीचं अधिवेशन घेण्यात येत आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. कोरोना काळातील भ्रष्टाचार, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाणारा मदत निधी, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, संजय राठोड यांच्यावरील आरोप आदी विषयांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘सकाळी राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप केले. आरोप मी समजू शकतो, पण त्या आरोपांना-टीकेला अर्थ असायला हवा. कशात काही नाही आणि आरोप करत सुटायचं ही सद्याच्या राजकारणातील दुर्दैवी पद्धत झाली आहे. त्यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार झाला असा आरोप केला. मला त्यांची थोडी कीव करावीशी वाटते. महाराष्ट्र सरकारने योग्य पाऊल उचलून कोरोना नियंत्रणात आणला, यात हजारो कोव्हीड योद्ध्यांचे योगदान आहे. विरोधकांनी कोव्हीड योद्धयांचा अपमान केलाय,’ असं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!