Share

…हे बाबासाहेबांच्या घटनेविरोधात आहे; राजीनाम्यानंतर राठोड भाजपवर संतापले

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता.

वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडली आहे. ‘हो, मी राजीनामा दिला आहे. गेले ३० वर्षे असलेल माझं राजकीय, सामाजिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने माध्यमांच्या द्वारे अत्यंत घाणेरडं राजकारण करून माझ्यावर व माझ्या समाजावर बदनामीकारक आरोप केले,’ असं भाष्य त्यांनी केलं आहे.

तर, ‘अधिवेशन आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. खरं तर कोणत्याही प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याचे परिणाम भोगावे लागले पाहिजे. हे चुकीचं असून माझ्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर याचा परिणाम झाला आहे. माझ्या समाजाची व माझी बदनामी झाल्यामुळे मी राजीनामा सोपवला आहे,’ असं म्हणत त्यांनी भाजपवर संताप देखील व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!