🕒 1 min read
लखनौ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लखनौ च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने आता पासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामुळेच आठवलेंच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्याला विशेष महत्व आलं आहे. येत्या निवडणुकांबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उत्तर प्रदेश मधील सन 2022 च्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत युती करेल, अशी आज घोषणा आज रामदास आठवले यांनी केली आहे. इतकच नाही तर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिस्पर्धक मायावतींना आरपीआयमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज लखनौ येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/IP80TpfhSg
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 28, 2021
यामुळे येत्या काळात उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलचं तापलेलं पाहायला मिळणार आहे. ‘रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल,’ असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !
- बहन मायावती आरपीआय मध्ये आल्यास त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू – रामदास आठवले
- ‘जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेसचे काही भले होणार नाही’
- अंकिताचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं अनफॉलो ; सुशांतचे चाहते म्हणाले…
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
