🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
संजय राठोड २३ फेब्रुवारी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. त्यावेळी ते पहिल्यांदा माध्यमांना सामोरे गेले. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, विरोधकांच्या वाढत्या आरोपांमुळे संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
भाजपकडून संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. राठोड यांना पदावरून हटवा ही मागणी जोर धरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर दबाव वाढत असल्याचे कळतयं.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्या दिवशी संजय राठोड यांनी पूजाला ४५ फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या १०१ या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्या दिवशी १०१ क्रमांकावरून झालेलं अरुण राठोडचं संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करावी, अशी मागणी देखील वाघ केली आहे.
चित्रा वाघ यांनी काल पुण्यात जाऊन पूजा राहत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. त्यानंतर पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषद घेवून त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी हे संपूर्ण प्रकरण पोलीस झाकायचं काम करत आहेत, असा आरोपही केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- रस्त्यावर तलवारीने केक कापने महागात, १३ जणांवर गुन्हा
- युवराज सिंगची खेळपट्टीवर टीका; मायकेल वॉनची म्हणाला…
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- प्रियदर्शिनीतील झाडांची काळजी शिवसेना घेईल-पालकमंत्री देसाई
- ‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
