🕒 1 min read
सिंधुदुर्ग : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
संजय राठोड २३ फेब्रुवारी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. त्यावेळी ते पहिल्यांदा माध्यमांना सामोरे गेले. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, विरोधकांच्या वाढत्या आरोपांमुळे संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
भाजपकडून संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. राठोड यांना पदावरून हटवा ही मागणी जोर धरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर दबाव वाढत असल्याचे कळतयं.
दरम्यान, यावर भाजप नेते माजी मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य केले आहे. ‘सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात’, असं तावडे म्हणाले.
‘सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे. अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल, अस मला वाटतं, असंही तावडेंनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- दीपिका ठरली Levi’sची भारतातील पहिला महिला ब्रॅंड ऍम्बेसेडर
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- आज ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता…
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
