🕒 1 min read
पुणे : राज्यभर पूजा चव्हाण आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या कथित संबंधाची जोरदार चर्चा सुरु आहे. संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप भाजपकडून केले जात आहे. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले होते.
या प्रकरणाचा थेट संबंध राज्याच्या मंत्र्यांशी जोडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राठोड हे तब्बल दोन आठवडे या प्रकरणाचा खुलासा न करता नॉट रिचेबल होते. यामुळे संशय अधिक बळावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पूजाचे पर्सनल फोटो व ऑडिओ रेकॉर्डिंग्ज समोर येत असून ते माध्यमांमधून देखील समोर येत आहे.
मात्र, मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संजय राठोड यांच्यावर टीका करतानाच मीडियाला देखील एक विनंती केली आहे. पूजाचे पर्सनल फोटो प्रसारित केल्याने, आमच्या लेकींवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियाने पूजाचे पर्सनल फोटो दाखवणे बंद करावे, अशी विनंती रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
रुपाली ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट –
आमची मीडियाला हात जोडून विनंती आहे, आता त्या पूजा चव्हाण केस मध्ये अजून पर्सनल तिचे फोटो दाखवू नये. आमच्या लेकींवर त्याचा परिणाम होतोय चुकीचा मेजेस जातोय हो. खूपच चुकीचा संदेश जातो समाजात. जे पुणे पोलिसांना नाही समजले ते सर्व जनतेला कळाले आहे.
खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे. आपण एक लोकप्रतिनिधी असून त्यांनी जवाबदारीने वागणे गरजेचेच होते. अश्या पध्दतीचे शेण खाऊन समाजात घाण पसरवत आहे. गरीब मुलीच्या आयुष्यच वाटोळे करत आहेत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर राहूच नये, जनाची नको मनाची लाज ठेवा.
पैशाच्या जोरावर अवघी 20 ,22 वर्षाची मुलगी भुलवता किंवा ती भुलली ही पुजाची चूकच आहे. तिला समजवणारे, चांगले सांगणारे भेटलेच नसतील पण तुमचे काय तुम्ही तर जेष्ठ नेते ,लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्हाला अक्कल नव्हती का? का तुम्ही वेळीच पूजा रोखले नाही, लांब केले नाही. तुमच्या कृत्याची आमच्या लेकी बाळींना चुकीचे ,घाण दाखले नकोत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर नसले पाहिजे. आपली पात्रता नाही त्या पदावर राहण्याची, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, पत्रकार,मीडिया यांना विनंती कृपया पूजा चव्हाण केस चे अजून खाजगी फोटो टाकून तारुण्यात येणाऱ्या तरुणींना चुकीचा मेसेज जाऊन देऊ नये हीच विनंती.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/5339927119380942
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानंतर धावपटू हिमा दासने १८ महिन्यानंतर ट्रॅकवर उतरून जिंकले सुवर्ण !
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
