Share

रस्त्यावर तलवारीने केक कापने महागात, १३ जणांवर गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

लातूर : सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. शिरुर अनंतपाळ तालूक्यातील हालकी येथे काही रस्त्यावर काही युवकांनी बर्थडे सेलिब्रेशन केले. यावेळी तलवारीने केक कापण्यात आला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक असे की, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथे २३ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. गावातील मनोज नारायणसिंह गहिरवार याचा वाढदिवस होता. यावेळी त्याने आणि त्याच्या मित्रांनी कायद्याचे उल्लंघन करत केकचा वापर तलवारीसाठी केला.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने मनोज नारायणसिंह गहिरवार याच्या घरी छापा टाकला. यावेळी मनोज गहिरवार याच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याच्यासोबत प्रकाश गोरोबा कोरे, सुमेरसिंह अनंतरामसिंह गहिरवार, रामसिंह उदयसिंह गहिरवार, प्रवीण उर्फ पवन प्रकाश कोरे, किशोर तुकाराम सुरवसे, गणेश रमेश सोनवणे, सतीश सोनेराव कोरे, अमोल नागोराव इंगळे, पांचाळ रतन गोवर्धन, प्रदिप दगडू बनसोडे, विकास सुरवसे, महेश हरिश्चंद्र सारंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!