🕒 1 min read
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून आला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, कालच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.
यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. यानंतर, इंग्लंडने भारताला दिलेलं ४९ धावांचं लक्ष्य अगदी सहजपणे गाठलं. बिनबाद ४९ धावा करत भारताने ही कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. दुसऱ्या दिवशीचं तिसरं सत्र सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा विजय मिळवला.
यानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंनी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. फक्त इंग्लिश खेळाडूच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या खेळपट्टीवर टीका केली आहे. भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत, तर दुसरा डाव ८१ धावांत गडगडला. इंग्लंडच्या २० पैकी १९ विकेट्स या भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. इशांत शर्माला एक विकेट मिळाली.
Well said Yuvi ???? https://t.co/Q6Nkcf6o5n
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 25, 2021
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं खे ळपट्टीवर टीका केली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानंही खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आणि वॉननं त्याचे आभार मानले.मायकेल वॉननं दोन दिवसात सामना संपल्यानंतर ट्विट केलं की, अशी खेळपट्टी असेल, तर काय पर्याय असेल हे मी सांगू इच्छितो. दोन्ही संघांना ३-३ डाव खेळण्यास द्यावे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी
- शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या दिनेश जैनला भाजपने केले स्थायी समितीचे सभापतीपद बहाल
- ए बापू तारी बोलिंग कमाल छे..! विराटने अक्षर पटेलची गुजरातीमध्ये केली प्रशंसा, पाहा व्हिडिओ
- पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड अधिवेशनापूर्वीच राजीनामा देणार ?
- दीपिका ठरली Levi’sची भारतातील पहिला महिला ब्रॅंड ऍम्बेसेडर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
