🕒 1 min read
अहमदाबाद : अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. याबरोबरच हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे. त्याने या विजयासह एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मागे टाकला आहे.
सामन्यानंतर भारतीय संघाच्या या विजयाचा नायक ठरला ‘लोकल बॉय’ अक्षर पटेलची कर्णधार विराट कोहलीने चक्क गुजराती भाषेत प्रशंसा केली. त्याचा गुजराती बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.
त्याचे झाले असे की, सामना संपल्यानंतर संघाबाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या अक्षरची मैदानावर मुलाखत घेत होता. त्यांची मुलाखत संपायला आली असतानाच विराट येतो आणि पंड्याच्या हातून माइक काढून घेतो. त्यानंतर अक्षरकडे पाहून तो म्हणतो की, “ए बापू तारी बोलिंग कमाल छे.” अर्थातच अक्षर तुझी गोलंदाजी शानदार आहे, असे तो गुजराती भाषेत म्हणतो.
DO NOT MISS: @hardikpandya7 interviews man of the moment @akshar2026.???????? – By @RajalArora
P.S.: #TeamIndia skipper @imVkohli makes a special appearance ????@Paytm #INDvENG #PinkBallTest
Watch the full interview ???? ???? https://t.co/kytMdM4JzN pic.twitter.com/QLJWMkCNM5
— BCCI (@BCCI) February 26, 2021
विराटला गुजराती बोलताना पाहून तिघेही खदखदून हसू लागतात. त्यांचा हा गमतीशीर व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला एका तासाच्या आतच हजारोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून मराठा समाजाची चेष्टा, परिणाम वाईट होतील; आंदोलकांचा इशारा
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून; सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणार; ऑनलाइन, ऑफलानचीही सुविधा
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
