परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढ आहे. गुरूवारी ४१ नव्या रुग्णांची नोद करण्यात आली आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाढत्या रुग्णसंखेमुळे जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आवाहन आहे.
परभणी जिल्ह्यात बुधवारी ५५ तर गुरुवारी ४१ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६४ वर पोहोचली आहे. तर गुरुवारी शासकीय रुग्णालायत उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८ हजार ४१५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७ हजार ८२८ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात देखील केली आहे. दरम्यान जिल्हाभरात आतपर्यंत कोरोनामुळे ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २६४ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून; सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणार; ऑनलाइन, ऑफलानचीही सुविधा
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
- जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा : मंत्री संजय बनसोडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
