🕒 1 min read
बीड : बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुंडे यांनी एचआयव्ही बाधित दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या चिमुकलीला केक भरवत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी धनंजय मुंडे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. या बालकांचे समाजातील स्थान अबाधित राहावे, यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. शासनही त्यासाठी पुढाकार घेतेय मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले.
बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इन्फंट इंडिया आनंदग्राम हा एचआयव्हीग्रस्त मुलांचा सांभाळ करणार प्रकल्प आहे. या प्रकल्पात संस्था संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांच्या पुढाकारातून एचआयव्हीसह जगणाऱ्या दोन जोडप्यांचा लग्न समारंभ पार पडला. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यात कोणत्याही धार्मिक पध्दतीने विवाह विधी न करता ‘वंदे मातरम्’ या गीताचे गायन करत दोन्ही जोडपी विवाहबंधनात अडकली.
आनंदग्रामचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी स्व. डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एचआयव्ही बाधितांची सेवा करण्याचे, त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे. हे अत्यंत महान कार्य आहे. आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या शासकांकडून दुर्लक्षित राहणे हे अनाकलनीय व दुर्दैवी असल्याचेही आहे. मात्र, यापुढे आपण आनंदग्रामसाठी शासकीय स्तरावर तर मदत करणार आहोतच शिवाय माझ्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी या संस्थेला ५ लाख रुपयांची मदत देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
