🕒 1 min read
मुंबई- बीडच्या परळी वैजनाथ येथील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
संजय राठोड प्रकरणावरुन विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच या सर्व प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे.संजय राठोड यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. तसेच पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शनानंतर राठोड यांच्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय.अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत.
ज्या महाराष्ट्राचा एक वेगळाच रुबाब आणि गौरव देशात आहे, आज तोच महाराष्ट्र ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यामुळे देशभर बदनाम होतोय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक जनतेला का माहिती देत नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून,
पूजा चव्हाण यांच्या आत्म'हत्या' प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना माझे काही प्रश्न आहेत…
मविआ सरकारकडून जनतेसह सर्वांनाचं या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत.@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @OfficeofUT pic.twitter.com/Gx8EvHftJW— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 24, 2021
या प्रकरणातील ऑडीओ सीडी व्हायरल झाल्या असून वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे पुरावे पुढे येत आहेत. तरीही कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. तरी तातडीने या प्रकरणाच्या तपासाबाबतची माहिती जनतेपुढे उघड करावी, अशी मागणी दरेकर यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे बुधवारी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेची कोंडी; मित्रपक्षांच्या नाराजीने उद्धव ठाकरेंवर वाढला दबाव
- औरंगाबाद मनपाच्या विरोधात व्यापाऱ्यांकडून बंदची हाक
- हर्सूल तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
- काँग्रेस नेते राहुल गांधींनी लुटला केरळमध्ये समुद्र सफारीचा आनंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
