🕒 1 min read
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. हा सामना सुरु होण्याआधी पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री किरण रिजिजू देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
उद्घटनादरम्यान, मोटेरा स्टेडियमला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. मोटेरा स्टेडियमचे नामांतर करून नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव करण्यात आले आहे. देशभरातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला आता नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.
यावरून राजकीय वाक्युद्ध सुरु झालायचे पाहायला मिळतय. विरोधकांनी स्टेडियमच्या नामांतरावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ‘मोदी सरकार कोणतीही नावं बदलत आहेत. भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे’, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला आहे.
‘नरेंद्र मोदींच्या नावाने ज्या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे त्याचं नाव आधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होतं. भारतरत्नाच्या नावाचा असा बदल करणं हे कुठेतरी सर्व भारतरत्नांचा अपमान केल्यासारखं आहे. हे अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही’, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा विचार करावा का?
- राकेश टिकैत यांनी स्वतःबद्दल केली ‘ही’ भविष्यवाणी
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे : चित्रा वाघ
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
