नवी दिल्ली- केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नाही. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे.
दरम्यान,प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान,भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी 12-13वर्षे तुरुंगात घालवावी लागतील, अशी स्वतःबद्दल भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले की, मला 12-13वर्षे तिहाड कारागृहात रहावे लागेल, परंतु किमान यामुळे शेतकरी या अन्यायाच्या जोखडातून मुक्त होणार असेल तर आम्हाला तुरूंगात रहायला आम्हाला हरकत नाही.ते म्हणाले की, कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर या वेळी क्रांती होईल. शेतकरी संसदेत जाऊन ट्रॅक्टर चालवतील.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा विचार करावा का?
- कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांच्या दर्शन वेळेत बदल !
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे : चित्रा वाघ
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे


