औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अन्य राजकीय पक्षांसमवेत आघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांचे अभिप्राय घेऊन त्यानंतर प्रदेश पातळीवर अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचाही समावेश आहे. मात्र, सध्याची औरंगाबाद काँग्रेसची स्थिती पाहता या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढल्यास काँग्रेसच्या निवडणुकीनंतरच्या स्थिती बाबत संभ्रम निर्माण होतो.
एकेकाळी काँग्रेसचा महापौर राहिलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ८ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती याही पेक्षा खराब असली तरी, सध्या राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असल्याचे दिसून येतय. त्यातच पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे आधीच जाहीर केले आहे. तर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यासह स्थानिक नेते मात्र, स्वबळाची भाषा करत आहे. मात्र, तसे झाल्यास काँग्रेसला फायदा होईल की नुकसान याचा अभ्यासक अंदाज बांधत आहेत.
माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष कार्याकडे लक्ष दिलेले नाही. माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी, अजूनही ते फुलंब्री मतदार संघातच अडकून आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचा नेता म्हणावे असा एकही चेहरा दिसत नाही. त्यातच इतर स्थानिक नेते मनपा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट करत आहेत. तसे झाल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र, त्याचा पक्षाला फायदा होईलच याची शाश्वती देता येत नाही. या सर्वात स्थानिक नेते महाविकास आघडीचा आग्रह धरतात की, स्वबळाचा नारा कायम ठेवतात हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले ; भाजप नेत्याची जहरी टीका
- कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांच्या दर्शन वेळेत बदल !
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे : चित्रा वाघ
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
