Share

जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची ‘ही’ आहेत अचंबित करणारी वैशिष्ट्ये

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद- अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच याच मैदानावर खेळवली जाणार आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणाऱ्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे.

६३ एकरमध्ये बांधलेल्या या स्टेडीयममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स आहेत. चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे.

मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत.भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता.

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.

२४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रेम्प हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात अहमदाबाद येथे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी मोटेरा स्टेडियमवर मोठा कार्यक्रमही घेण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!