Share

कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांच्या दर्शन वेळेत बदल !

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण गेल्या आठवड्याभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.

यामुळे महाराष्ट्र शासन वेळीच कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. सार्वजनिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर देखील काही दिवसांसाठी बंदी आणल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

सलग सुट्ट्यांच्या काळात भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेता अनेक मंदिरे व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जात आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे करवीरनिवासिनी आंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराची दर्शन वेळेत बदल करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय घेतला आहे.

सद्या दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी होती. ती 25 फेब्रुवारीपासून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक, सोशल डिस्टन्सिंगसह सँनिटायजर हातावर घेऊन दर्शन करण बंधनकारक असल्याचं अवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!