🕒 1 min read
मुंबई : संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.
मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय. अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोडांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे. बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे’, अशी जहरी टीका चित्रा यांनी केली आहे.
‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्या दोन तरुणांना जुजबी चौकशी करुन सोडून देण्यात आलं. त्यापैकी एकही तरुण पोलिसांच्या ताब्यात नाही. पोलिसांनी या तपासात संपूर्णपणे दिशाभूल केली आहे. एवढं सगळं करुनही हा मंत्री आता कसलीही लाज न बाळगता समोर फिरतो आहे’, अशी खंतही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.
तसेच महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. #JusticeForPoojaChavan’, अशा आशयाचे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केलीये.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
- भोंगळ कारभार : कोकणातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच सेंटर, तर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना…
- आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात बच्चु कडूंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
- भोसरी जमीन प्रकरण : एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा कायम !
- ‘हे’ मंत्री मराठा समाजाचे वैरी आहेत ; विनायक मेटेंचा घणाघाती आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
