Share

भोसरी जमीन प्रकरण : एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा कायम !

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या व्यवहारामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद त्यागावे लागले होते.

यानंतरच्या काळात एकनाथ खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे व नाशिकच्या प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा ४० कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे.

या जमीन खरेदी प्रकारणामुळेच एकनाथ खडसे यांना ईडीशी सामना करावा लागत आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या हायकोर्टातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या चौकशीची व्हिडिओग्राफ करण्याची मागणी या याचिकेत आहे. तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे.

उच्च न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. यामुळे ईडीला कारवाई करण्यास परवानगी मिळणार का ? याकडं राजकीय क्षेत्रच लक्ष्य लागलं होतं. मात्र, आजची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. आता, 8 मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!