Share

प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही; मीम्स पाहून व्हाल वेडे !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या अनोख्या पेहराव व हेअर स्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडे प्रियंकाने एक युनिक ड्रेस कॅरी केला आणि काय तर सोशल मीडियावर ‘मीम्ससेना’ लगेच अ‍ॅक्टिव्ह झाली. प्रियंकाच्या या ड्रेसवर इतके मीम्स आणि जोक्स बनलेत की ते वाचून खुद्द प्रियंकालाही हसू आवरेनासे झाले. तिने स्वत:ही काही मजेदार मीम्स सोशल मीडियावर शेअर करत, मीम्ससेनेचे आभार मानलेत.

आज एक ट्विट करत तिने स्वत:वरचे एक भन्नाट मीम शेअर केले. खूपच मजेदार आहे. माझा दिवस बनवण्यासाठी आभार मित्रांनो, असे हे मीम्स शेअर करत तिने लिहिले. तिचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले. मग काय, सोशल मीडियावर तिच्या या ड्रेसवरचे असंख्य मीम्स व्हायरल झालेत. कुणी प्रियंकाच्या ड्रेसला सुतळी बॉम्ब म्हटले तर कुणी हॉट एअर बलून. कुणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत प्रियंकाच्या ड्रेसची तुलना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!