Share

बाईक लव्हर्ससाठी खुशखबर ! ‘जावा फोर्टी टू’ नव्या फिचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तरुणाईची क्रेज असलेल्या जावा फोर्टी टू बाईक आता नव्या रुपात येत आहे. दुचाकी निर्माती कंपनी जावाने नवीन व्हेरियंटमध्ये जावाला भारतात लाँच केले आहे. हि बाईक सर्वात आधी भारतात आली होती आता या बाईकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जसे की, आकर्षक रंग आणि लूक देण्यात आला आहे. आजपासून ही बाईक संपूर्ण भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ही बाईक डीलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्याच बरोबर कंपनीने आपल्या आणखी दोन मॉडल जावा आणि पर्क या गाड्या देखील अद्ययावत केल्या आहेत. या निमित्ताने क्लासिक लिजंड्सचे सीईओ आशिष सिंग जोशी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सर्वांनी जावाच्या बीएस ६ एडिशनला पाहिले होते. आम्ही तेथेच थांबलो नाही. तसेच आपल्या बाईकच्या परफॉर्मन्स आणि एक्सपीरियन्सला आणखी चांगले करीत यात २.१ व्हर्जनमध्ये अपडेट केले आहे. कंपनीने नवीन जावा फोर्टी टू ला आधीच्या तुलनेत आणखी आकर्षक बनवले आहे. यात आधीच्या तुलनेत मोठी सीट, फाइन ट्यूंड क्रॉस पोर्ट इंजिन पंचसाठी दिले आहेत.

कंपनीने नवीन ‘जावा४२’ चा लूक पूर्वीपेक्षा आणखीन आकर्षक आणि स्टायलिश बनवला आहे. बाईकच्या सीटचा आकार तुलनेत मोठा असून फाइन ट्यूंड क्रॉस पोर्ट इंजिन पंचसाठी देण्यात आले आहेत. क्लासिक लेजेंडचे सीईओ यांनी पुढे बोलताना सांगितले, की बाईकमध्ये ३ कलर ऑप्शन्स् देण्यात आले आहेत. यामध्ये ओरियन रेड, सीरियस व्हाईट, ऑलस्टार ब्लॅक या कलर्सचा समावेश आहे.

‘जावा फोर्टी टू बाईक’ च्या या रेंजमध्ये फ्लायस्क्रीन आणि अपडेटेड हेडलॅम्प ग्रिल पहायला मिळणार आहे. अलॉय व्हिल्ससह ट्यूबलेस टायरदेखील या बाईकमध्ये असणार आहे. यासह ग्राहकांना त्यांना आवडणारे अ‍ॅक्सेसरीज खरेदी करण्याचा पर्याय कंपनीने उपलब्ध करुन दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!