🕒 1 min read
कोल्हापूर : राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या चौकशी समितीने या संचालकांना क्लीनचिट दिली आहे. सहकार आयुक्तांना समितीने अहवाल सादर केला, त्यातून ही माहिती समोर आली. राज्य सहकार बँकेच्या प्रकरणात अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीनचिट मिळाली आहे.
यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरआरोप केला आहे. मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांतदादा पाटील यांनी माझं नाव घातलं. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली.’ असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
तर, ‘सत्ता असताना भाजपमध्ये अनेक नेते गेले होते. मी चंद्रकांतदादांना म्हणालो होतो ही सत्तेचं सूज आहे. आता ती सूज आता कमी व्हायला सुरुवात झालीय. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! ,’ असा इशारा देखील त्यांनी भाजपसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
काय आहे हे प्रकरण ?
महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई हायकोर्टात काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र को ऑप बँक ही शिखर बँक आहे. या बँकेच्यावतीने 2005 ते 2010 या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं होतं. हे कर्ज सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्या यांना आणि इतर कंपन्या, कारखाने यांना दिलं होतं. हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुख्य म्हणजे हे कर्ज राज्यातील अनेक राजकारण्यांच्या कंपन्या, कारखान्यांना दिलं होतं. पुढे हे कर्ज वसूल झालं नाही. त्यामुळे हा एक मोठा गैरव्यवहार आहे असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि तेव्हाचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या कर्जासाठी मोठ्या शिफारसी होत्या. ही सर्व कर्ज पुढे बुडीत निघाली.हे कर्ज वसूल करण्यात अपयश आले होते. यामुळे बँकेचे नुकसान झाले असा आरोप करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

