Share

रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !

Published On: 

🕒 1 min read

शिवनेरी : सर्वत्र आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.

दरवर्षी शिवजन्मस्थळ शिवनेरीवर महाराष्ट्र सरकारतर्फे शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील या स्थळी दाखल होत असतात. कोरोनाचं सावट हे कायम असल्याने हा सोहळा साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आदींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव व पालखीचा सोहळा पार पडला.

दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आलेली आहे. राज सदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ही विद्युत रोषणाई केली गेली असून नागरिकांनी देखील या विद्युत रोषणाईचा भरभरून कौतुक केल्याचं दिसून आलं. मात्र, खासदार संभाजीराजेंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे.

यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडण चुकीचं आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!