🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. अशात आज (१८ फेब्रुवारी) दुपारी चेन्नईत एकीकडे आयपीएल २०२१ चा मिनी लिलाव चालू असताना दुसरीकडे भारतीय खेळाडू अहमदाबादला जाण्यासाठी निघणार आहेत.
त्यानंतर अखेरचे २ कसोटी सामने झाल्यानंतर हे दोन्ही संघ ५ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळतील. यातील वनडे सामन्यांचे आयोजन पुणे शहराच करण्यात आले आहे. परंतु अखेरचा वनडे सामना पुण्यातून दुसऱ्या शहरात हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार, पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका ही अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये १२, १४, १६, १८ आणि २० मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यांनतर होणाऱ्या ३ एकदिवसीय मालिकेतील सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होते. परंतु, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना (२८ मार्च) मुंबईमध्ये खेळवला जाऊ शकतो. याचे कारण असे की, इंग्लंडच्या खेळाडूंना ब्रिटेनला जाण्यासाठी सोईस्कर होऊ शकते. याबाबतीत अजुन अधिकृतपणे निर्णय घेण्यात आला नाही.
महत्वाच्या बातम्या
- महिलेला मारहाण करणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
- योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना औषधह बाजारात, लॉचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गडकरी
- पोलिस कर्मचाऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, सोशल मिडियावर ऑडीओ क्लिप व्हायरल
- सातारा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल केला फिर्यादींना परत
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’


