🕒 1 min read
चेन्नई : यजमान भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला 134 धावांवर गुंडाळत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या आणि मिळालेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते.
मात्र, टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
स्टोक्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि 51 चेंडू खेळत फक्त 8 धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या डावात अश्विनच्या फिरकीच्या अडकलेला स्टोक्सला दुसऱ्या डावातही अश्विननेच पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. यानंतर, अक्षरने पोपला बाद करत इंग्लंडला सहा धक्का दिला होता. अशाप्रकारे, पाहुण्या संघाला टीम इंडियाने धूळ चारली आहे. त्यानंतर भारताच्या या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी खेळाडूही भारताच्या कामगिरीवर खुश आहेत. यात मनोज तिवारीचाही समावेश आहे.
England team ki kutaai hogayi hai ???? #PawriHoRahiHai #IndiavsEngland #TeamIndia pic.twitter.com/Uwww6oewFo
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 16, 2021
मनोज तिवारीने भारतीय संघाच्या विजयाचा क्षण टिपणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने आपल्या घरून टिव्हीवर सामना पाहत असताना व्हिडिओ टिपला आहे. या व्हिडिओला त्याने ‘इंग्लंड की कुटाई हो गई’, असे जबरदस्त कॅप्शन देखील दिले आहे. विशेष म्हणजे सध्या ट्रेडिंग असलेला एक संवादही त्याने व्हिडिओत म्हटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ कायम; सर्वसामान्य चिंतेत !
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
