🕒 1 min read
मुंबई: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये आज पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
यासोबतच पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ९५ रुपये ४६ पैसे, तर मंगळवारी ९५ रुपये ७५ पैसे इतका होता. तर डिझेलचा दर ९० च्या जवळ पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर ८६ रुपये ९८ पैशांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ८६ रुपये ३४ पैसे इतका होता.
दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत. २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- Toolkit Case: आरोपी शांतनुला तात्पुरता अटकपूर्व जामीन, दिशालाही मिळाला ‘हा’ दिलासा
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
