Share

टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली होती.

दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत. यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.

याप्रकरणी आता पोलिसांकडून अटक सूत्र करण्यात आले आहे. आतापर्यंत ७ जणांची नाव समोर आली आहे. यामध्ये कर्नाटकातील दिशा रवी, निकिता जेकब, बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूक त्याच बरोबर इतर काही जण तर आता अनिता लाल हे नाव समोर येत आहे. धालीवालची सहकारी अनिता लाल ही देखील आता पोलिसांच्या रडारवर आहेत. दिशा रवीच्या अटकेनंतर आता निकिता जॅकबवर अटकेची टांगती तलवार आहे. तर शंतनू मुळूक ला ट्रान्झिट ;ॅडव्हान्स जामीन मिळाला आहे. याशिवाय पुनीत आणि फ्रेडरिकही पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्वांव्यतिरिक्त खलिस्तानचा अतिरेकी भजनसिंग भिंडरदेखील यामध्ये असल्याचं दिसत आहे.

कॅनडामधील व्हँकूव्हरमध्ये राहणारी अनिता लाल ही धालीवालची सहकारी आहे. व्यवसायापासून ते खालिस्तानी अजेंडापर्यंत प्रत्येक गोष्टीत ती भागीदार असल्याचे मानले जाते. अनिता लाल खलिस्तानी समर्थक पोएटीक जस्टिस सोसायटीची सह-संस्थापक आहेत. तसेच ती या संस्थेचे कार्यकारी संचालक देखील आहेत.

अनिता लाल खलिस्तान समर्थक धालीवाल याची मुख्य सल्लागार असल्याचं बोललं जात आहे आहेत. अनिता लालच्या ट्विटर अकाऊंटवर नजर टाकल्यास ती शेतकरी आंदोलन आणि भारताविरूद्ध सुरु असलेले हॅशटॅग सतत वापरत होती. धालीवालसोबत टूलकिटबाबत झालेल्या झूम मिटिंगमधअये अनिता लाल सहभागी असल्याची माहिती समोर येत आहेत. दिल्ली पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!