मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं आहे. राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजय राठोड यांची नियमांनुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राठोडांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. ‘राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतून केलं आहे.
तर, ‘संजय राठोड हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांच्या सभोवताली वादळ घोंघावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याप्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे पोलीस याबाबत कारवाई करतील. उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील व हळवे नेते आहेत, त्यामुळे राज्यात कायद्याचचं राज्य आहे. सरकार सत्याच्या मार्गानेच चाललं आहे.’ असं देखील राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली, ते अतिशय नीच कृत्य आहे’
- फासे पलटणार ? आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही; मलिकांची फडणवीसांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
