औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी शासनाकडून पुर्णपणे मदत केली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुलंब्री येथे सांगितले. फुलंब्री तालुक्यातील पाल येथे उभारण्यात आलेल्या स्टेडीअमच्या उद्घाटन कार्याक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थित असेलेल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती.
यावेळी बोलताना अजित पवारांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून पुर्णपणे मदत करण्यात येईल. मात्र, हा साखर कारखाना स्थानिक लोकांनीच चालविला पाहिजे, त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह केला. देवगिरी साखर कारखान्यावर एकूण ६९ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज आहे. तर कारखान्याची मालमत्ता ही १९७ कोटी ५३ लाखांची आहे. या रकमेवर चार कोटीचे व्याज प्राप्त झालेले आहे. समृद्धीचे दिलेले ३१ कोटी ३१ लाख रु. व चौका येथील कारखान्याच्या मालकीची ४२ एकर २२ गुंठे जमीन ही लिलावात विक्री केली. याचे सात कोटी ४० लाख रुपये असे एकूण ३८ कोटी ७१ लाख रुपये हे ऋण प्राधिकरण यांच्याकडे रोख रकमेत पडून आहे.
देवगिरी कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी काही दिवसांपुर्वी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या बैठकीत देवगिरी सहकारी साखर कारखाना पुनरुज्जिवित करणे व संस्थेच्या देणीबाबत तडजोड करणे, अशा दोन विषयांवर एकमुखी ठराव संमत झाला. यामुळे दहा वर्षांपासून बंद कारखाना चालू होणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत होते. पण या बैठकीनंतर कारखाना सुरु करण्याबाबत हालचाली पुन्हा मंदावल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाल येथील संदीप जाधव या तरुणाने स्वखर्चाने पावणेचार एकरांत उभारलेल्या स्टेडियमचे उद्घाटन यांच्या हस्ते झाले.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’नंतर आता शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान !
- श्रीलंकेत भाजपला नो एंट्री ; अमित शाह यांना श्रीलंकेचे उत्तर
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याच्या आरोप प्रकरणी क्रिकेटपटू जाफरच्या चौकशीचे आदेश
- इंग्लंडच्या लाजस्पद पराभवानंतर पीटरसननं शोधलं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
