चेन्नई : टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
इंग्लंडचा हा दणदणीत पराभव त्यांचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर आपल्या टीमला खेळ सुधारण्याचा सल्ला देण्याच्या ऐवजी त्यानं भारतीय टीमलाच टोला लगावला आहे.
पीटरसननं दुसरी टेस्ट संपल्यानंतर लगेच खास हिंदी भाषेत ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये इंग्लंडच्या B टीमचा पराभव केल्याबद्दल भारतीय टीमचं अभिनंदन, असं ट्वीट पीटरसननं केलं आहे. त्याचं हे ट्वीट आता चांगलंच व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या ट्वीटनंतर काही वेळानं पीटरसननं आणखी एक ट्वीट करत टीम निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भारताविरुद्ध ही टेस्ट हरलेल्या इंग्लंडच्या टीममध्ये अनेक प्रमुख खेळाडू नाहीत. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे ही टेस्ट खेळू शकला नाही. जेम्स अँडरसनला टीम मॅनेजमेंटनं विश्रांती दिली आहे. जोस बटलरही पहिल्या टेस्टनंतर विश्रांती घेण्यासाठी मायदेशी परतला आहे. तर जॉनी बेअरस्टो देखील सध्या विश्रांती घेत असून तो भारतामध्ये आलेलाच नाही. चार प्रमुख खेळाडूंच्या विना खेळणारी ही इंग्लंडची B टीम असल्याचं पीटरसननं म्हंटलं आहे.
https://twitter.com/KP24/status/1361574807167528962?s=20
https://twitter.com/KP24/status/1361583619417010176?s=20
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

