🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडमध्ये झालेल्या झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लावला आहे.
माहिम वर्मा यांनी मीडियाच्या माध्यमातून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले.“संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.
आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी सोमवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे व मोहम्मद कैफ यांच्यासह अनेकांनी सडेतोड उत्तर दिले. क्रिकेटपटू वासिमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री रावत यांची भेट घेतली आणि त्यानंतर यांनी चौकशीचे आदेश दिले. ”ही नेहमीची बैठक होती आणि त्यावेळी जाफरचा मुद्दा निघाला. जर मला कोणतीही तक्रार मिळाली, तर या प्रकरणाची चौकशी नक्की केली जाईल,”असे रावत यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी माहिम वर्मा यांनी वासिमवर टीका केली. त्याला उत्तर देताना वासिम म्हणाला,” माझ्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे प्रचंड दु:ख झाले आहे.संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे. इक्बाल अब्दुलाला संघाचे कर्णधार बनवायचे होते, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
