Share

पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !

Published On: 

पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

आता पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येचा संपूर्ण तपास हे पुणे पोलीस करत आहेत. त्यामुळेच, खुद्द पोलीस महासंचालक पुण्यात आले आहेत. ते स्वतः माहिती घेऊन लवकरात लवकर सत्य समोर येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येतंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!