Share

दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीच्या व्हॉट्सअॅप चॅटस पुन्हा मिळवल्याचा दावा केला आहे. स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि दिशा यांच्यात यात थेट संवाद झालेला पाहायला मिळतो. या चॅटमध्ये टूलकिटचा उल्लेख होता. या टुलकिटमुळे दोघींवरही यूएपीए कायद्यान्वये (बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा) कारवाई होऊ शकते, असे दिशाने ग्रेटाशी झालेल्या संभाषणातही म्हटले होते. टूलकिट लीक झाली आहे का आणि काही काळ गप्प बसायला पाहिजे का, असेही दिशाने ग्रेटाला विचारले. दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की, दिशाने टूलकिटची कागदपत्रे टेलिग्रामवर थनबर्गला पाठविली होती आणि त्यावर ट्विट करण्यास सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाने एक व्हॉट्सअप ग्रुपही डिलीट केला आहे. याव्यतिरिक्त, काही चॅट्सही हटविण्यात आल्या आहेत, त्यात टूलकिटवर चर्चा झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कारणांमुळेच दिशाला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा, निकिता जेकब आणि शंतनू यांचा संबंध कॅनडामध्ये राहणाऱ्या पुनीत नावाच्या महिलेने जोडला होता.

‘एबीपी न्यूज’ने दोघींमधील व्हॉट्सअपवरील संभाषण शेअर केले आहे…

ग्रेटा थनबर्ग : खूप चांगले झाले असते, जर हे आताच तयार झाले असते. यादरम्यान मला खूप धमक्या मिळाल्या असत्या… यामुळे तर मोठा गोंधळ उडालाय.
दिशा रवी: शिट, शिट, शिट… आता पाठवत आहे. तू टूलकिट अजिबात ट्विट करू शकत नाहीस का?
दिशा रवी : आपण आता काही बोलू शकत नाही का? मी वकिलांशी बोलते. आय एम सॉरी, यात आपले नाव आहे आणि आपल्याविरुद्ध यूएपीए लागू शकतो. तू ठीक आहेस ना?
ग्रेटा थनबर्ग : मला काहीतरी लिहायचे आहे.
दिशा रवी : तू मला 5 मिनिटे देशील? मी वकिलांशी बोलत आहे.
ग्रेटा थनबर्ग: कधी-कधी या प्रकारची द्वेषाची वादळे येतात, ती खूप जबरदस्त असतात.
दिशा रवी : नक्कीच… मला माफ कर, आम्ही सर्व घाबरलेलो आहोत, कारण इथं परिस्थिती बिकट होण्यास सुरुवात झाली आहे, पण तुला कोणतीही झळ बसणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. आम्हाला सर्व सोशल मीडिया हँडल्स डिअॅक्टिव्हेट करावे लागतील.

खलिस्तानी संघटनेचे षडयंत्र उघड
कॅनडामध्ये अवघ्या 11 महिन्यांपूर्वीच पोएटिक जस्टिस फाउंडेशन (पीजेएफ) ची स्थापना झाली होती. खलिस्तानी अजेंडा पुढे करणे हादेखील त्यांचा हेतू आहे. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणात या संस्थेचे नाव पुढे येत आहे. आतापर्यंतच्या तपासणीत असे समजले आहे की, पीजेएफने शेतकरी आंदोलनाच्या आडून भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा कट रचला होता. दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केलेली हवामान कार्यकर्ती दिशा रवीची पीजेएफचा सहसंस्थापक एमओ धालीवाल सोबत ऑनलाईन मीटिंग झाली होती. तथापि, धालीवाल या संस्थेच्या स्थापनेचा हेतू लोकांना मानवाधिकारांविषयी संवेदनशील बनविण्याचा आणि दक्षिण आशियामधील रहिवाशांमध्ये परस्पर संपर्क वाढविण्याच्या प्रयत्न असल्याचे दाखवले गेले आहे. सध्या पीजेएफ भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे. आपल्या संकेतस्थळावर त्यांनी असेही लिहिले आहे की, आम्ही सध्या शेतकरी आंदोलनात अतिशय सक्रियपणे सहभागी आहोत, ज्याने जगभरातील भारतीयांना सक्रिय केले आहे.

चुकून लीक झाली होती टूलकिट
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, देशाविरुद्ध एक मोठे षडयंत्र तयार करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये दिशा रवी, शंतनू, निकिता जेकब, एमओ धालीवाल यांच्यासह अनेक लोक जोडले गेले होते. सोमवारी दिल्ली पोलिसांनी दावा केला की, ही टूलकिट दिशा रवी, निकिता आणि शांतनु यांनी तयार केली होती. यासाठी 11 जानेवारी रोजी झूमवर बैठकही घेण्यात आली. ज्यामध्ये 70 जण उपस्थित होते. सुरुवातीला ही टूलकिट फक्त काही लोकांना देण्यात आली, ज्यांना खलिस्तानी अजेंडा पुढे रेटायचा होता. परंतु, ग्रेटाच्या मार्गाने ती चुकून पब्लिक डोमेनमध्ये प्रकाशात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!